best news portal development company in india

कावनईच्या श्री कपिलधारा तीर्थक्षेत्री अध्यात्म, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम; भूमिपूजन, वृक्षारोपण व गोदावरी गंगातीर्थ पूजन सोहळा उत्साहात

SHARE:

प्रतिनिधी:एवन न्युज महाराष्ट्र, नाशिक

कावनई, नाशिक : कावनई येथील श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन, वृक्षारोपण आणि श्री गोदावरी गंगातीर्थ पूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा मान लाभला. या पावन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. छगनराव भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी संत-महंत, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांसमवेत श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ येथे दर्शन घेत धार्मिक विधींमध्ये सहभाग नोंदवून आशीर्वाद प्राप्त करण्यात आले.
कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या पावन भूमीत पार पडलेल्या या सोहळ्यात भूमिपूजनासोबत वृक्षारोपण आणि गोदावरी गंगातीर्थ पूजन करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्वासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही लाभला.
अध्यात्म, संस्कृती आणि निसर्ग संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणणारे असे उपक्रम समाजाला सकारात्मक दिशा देणारे आणि भावी पिढीला प्रेरणा देणारे ठरतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कावनई येथील श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थाच्या विकासासोबतच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित भाविक आणि मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.

सत्य वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्युज महाराष्ट्र
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई