प्रतिनिधी : गोरख कासबे,ए वन न्यूज महाराष्ट्र,गिरणारे
नाशिक / दिंडोरी : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता धरणांच्या पाणीपातळीवर दिसून येत आहे. दिंडोरी तालुक्याच्या सीमेवरील आळंदी धरण आज रात्री ओव्हरफ्लो झाले असून, धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
आळंदी धरणातून सोडण्यात येणारे पाणी थेट गोदावरी नदीपात्रात जात असल्याने नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच नाशिक शहरासाठी महत्त्वाचे असलेले गंगापूर धरणही आज रात्री ओव्हरफ्लो झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दोन्ही धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधील नागरिक, शेतकरी आणि प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात किंवा नदीच्या पाण्यात जाणे टाळावे. तसेच जनावरे नदीकाठी घेऊन जाऊ नयेत. नदीकाठच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाणी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
सध्या नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......