best news portal development company in india

मयताच्या अंत्ययात्रेलाही रस्ता नाही! सुकेणेतील ५०-६० कुटुंबांचा संताप; चार महिन्यांपासून वाहतुकीचा प्रश्न गंभीर…

SHARE:

सुकेणे, ता. निफाड (प्रतिनिधी) : ए वन न्युज महाराष्ट्र
सुकेणे:जिवंतपणी रस्ता नाही आणि मृत्यूनंतर अंत्ययात्रेसाठीही रस्ता नाही, अशी संतप्त आणि वेदनादायी परिस्थिती मौजे सुकेणे, ता. निफाड येथील नागरिकांवर ओढावली आहे. संपतराव भिमाजी काळे यांचे आज दुःखद निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नसल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांना अक्षरशः बैलगाडीचा आधार घ्यावा लागला. या घटनेमुळे प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सुकेणे परिसरातील जुन्या गोंडेगाव रस्त्याची दुरवस्था झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या रस्त्याबाबत प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अंत्ययात्रेसाठी रस्ताच उपलब्ध नसल्याचे दृश्य समोर आल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतरही त्यांना सन्मानाने अंत्यविधीच्या ठिकाणी नेण्यासाठी रस्ता मिळू नये, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
      या भागात सुमारे ५० ते ६० नागरिकांची वस्ती असून, रस्त्याअभावी दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचे ग्रामस्थ सांगतात. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनते. मागील सुमारे चार महिन्यांपासून वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली असून, नागरिकांना अनेकदा आवश्यक वस्तू आणि सामान डोक्यावरून वाहून न्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
  रस्त्याच्या प्रश्नाबाबत प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देऊनही परिस्थितीत बदल झाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एका नागरिकाच्या अंत्ययात्रेसाठीही रस्ता उपलब्ध करून देता येत नसेल, तर प्रशासनाच्या विकासकामांचा नेमका फायदा कोणाला? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शंकरराव रामभाऊ काळे, बापूसाहेब रामभाऊ काळे, मनोज धोंडीराम काळे, नामदेव संपतराव काळे, संदीप काळे (भावड्या), मदन काळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जुन्या गोंडेगाव रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, रस्ता नसल्याने नागरिकांना अंत्ययात्रेसाठी बैलगाडीचा आधार घ्यावा लागल्याची घटना प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का आणि सुकेणेकरांना हक्काचा रस्ता मिळणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्युज महाराष्ट्र
संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क:-९४२२९५२५१३
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई