प्रतिनिधी: रमेश नळे, राहता

राहता : दि , 13 नोव्हेंबर — वाकडी येथे आज महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत 149 कोटी 83 लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या गोदावरी उजवा तट कालवा किमी 65 ते 107 मध्ये वितरण व्यवस्थेचे नूतनीकरण करणे कामाचा भूमिपूजन समारंभ जलसंपदामंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पा. साहेब यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री मा.श्री. अण्णासाहेब म्हस्के पा. साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.


आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या वतीने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी सदर काम सुरु केल्याबद्दल मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पा. साहेब यांचे आभार मानले. यामध्ये चारी नं. 10 ते 17 व वॉटर कोर्स नं. 28 ते 45 यांचे नूतनीकरण होणार आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रविणजी शिंदे, गौतम सहकारी बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेबजी कोते, नाशिक पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री.गोवर्धने साहेब, कार्यकारी अभियंता सोनालीताई शहाणे, गोदावरी उजवा कालव्याचे उपकार्यकारी अभियंता विवेकजी लव्हाट, भाऊसाहेबजी शेळके, दिलीपराव चौधरी, दिपकजी वाघ, सोपानकाका वाघ, अनिलजी कोते, अण्णासाहेबजी कोते, रुपेशजी गायकवाड, दिलीपराव चौधरी, डॉ. धनंजयजी धनवटे, दशरथजी ठमके, विजयजी सदाफळ, बापूसाहेबजी लहारे, निलेशजी कोते, डॉ. संपतजी शेळके, सुनीलजी कुरकुटे, पोपटजी लहारे आदींसह वाकडी, रामपूरवाडी, नपावाडी, धनगरवाडी, चितळी, जळगाव, पुणतांबा व शिंगवे येथील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





