
प्रतिनिधी नाशिक
नाशिक ,येवला तालुक्यातील तलाठी लाच घेताना यशस्वी सापळा, गुन्हा दाखल…
नाशिक:-राज्यात विविध ठिकाणी भ्रष्टाचार उघडकीस येत आहे,त्यातच येवला तालुक्यातील भ्रष्टाचार नुकताच उघडकीस आला आहे. यामध्ये तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार आलोसे श्री बापू वामनराव पवार वय ५४ वर्षे, व्यवसाय-नोकरी तलाठी महसूल अधिकारी ,सजा नगरसूल अति. कार्यभार कुसमाडी ता येवला जि नाशिक वर्ग-3, यांनी तक्रारदार यांच्याकडे दिनांक 7/1/2019 रोजी लाचेची मागणी.1500/-रुपये केली व मांडवली मध्ये लाच 1000/- ठरली व ही रक्कम 8/1/2025 रोजी रक्कम. 1000/-स्वीकारताना रंगेहात पकडले.
सविस्तर असे की, येथील तक्रारदार यांनी त्यांचे वडिलोपार्जित शेत पत्नी व मुलाच्या नावे दुय्यम निमधक यांचेकडे दस्त नोंदणी केली होती . त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर लावण्यासाठी तक्रारदार यांनी आ लो से यांचेकडे दिली होती. परंतू सदरची नोंद मुलाचे नाव चुकल्याने रद्द झाली होती.ती दुरुस्त करून ७/१२ उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी लोकसेवक बापू पवार यांनी त्यांच्यासाठी १००० रुपये व मंडळ अधिकारी यांचेसाठी ५०० रुपये लाचेची मागणी करून नोंद करण्यासाठी प्रथमतः १००० रुपये लाच स्वतःसाठी स्विकारली असता, रंगे हाथ पकडण्यात आले असुन, आलोसे यांचे विरुध्द येवला तालुका पोलीस स्टेशनं , नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7,7a अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा. जिल्हाधिकारी नाशिक
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा अधिकारी-श्रीमती स्वाती पवार पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. नाशिक.
सापळा पथक’ पो. हवा शरद हेंबाडे, पो. ना युवराज खांडवी, चापो हवा विनोद पवार
मार्गदर्शक मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. नाशिक परीक्षेत्र नाशिक,मो. नं. 9371957391
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारीध्कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे संपर्क करावा
दुरध्वनी क्रमांक. 02532578230
’टोल फ्री क्रमांक १०६४
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




